28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान

मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले. ही मुलाखत म्हणजे ट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप असल्याची टीका शेलार यांनी केली.

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही शेलार यांनी म्हटले. आता महाराष्ट्रद्रोह होत नाही का, हा राज्याचा अपमान नाही का? असा सवालही शेलार यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांना पालापोचाळा म्हटले. त्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली.

भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले की, विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि विस्कळीत झालेले नेते या दोघांच्या मुलाखतीपेक्षा टिझर बरा होता. या मुलाखतीवर आम्ही भाष्य केलेही नसते. पण सातत्याने भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शेलार यांनी म्हटले की, ज्यावेळी मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हाही भाजपला इशारे देण्यात आले.

मग मुख्यमंत्रिपदावर बसले तेव्हाही भाजपला इशारे दिले आणि आता पायउतार व्हावे लागले तेव्हाही भाजपला इशारे दिले आहेत. इशारे आणि टोमणे मारल्यानंतर आपल्याला महत्त्व मिळेल यातून हे सगळे सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले.

एक दिवसासाठीही मुख्यमंत्रिपद सोडले नाही
उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत आपल्या आजारपणात सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगितले . उद्धव यांना सहानुभूती हवी आहे, त्यासाठी ते असे बोलत असल्याचे शेलार यांनी सांगितले. तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा पदभार कुणाला दिला नसल्याची टीका शेलार यांनी केली. या आजारपणात ममता बॅनर्जी यांना भेटत होते. शरद पवार यांच्यासोबत बैठका सुरू होत्या, असेही शेलार यांनी म्हटले.
\\\\

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या