27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeऔरंगाबादमोहटादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या औरंगाबादच्या भाविकांच्या कारला अपघात; दोघांचा मृत्यू

मोहटादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या औरंगाबादच्या भाविकांच्या कारला अपघात; दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील मोहटादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला भरधाव महिंद्रा स्कॉर्पिओने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीजवळ झालेल्या या अपघातात चित्तेपिंपळगाव येथील दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अहमदनगर ट्रॅफिक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील चित्तेपिंपळगाव येथील झिंजुर्डे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी आले होते. दरम्यान दर्शन घेऊन झिंजुर्डे कुटुंब परत येत असतानाच रात्री आठ वाजेच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला.

मारुती अल्टो कारमधून औरंगाबादकडे परतणा-या झिंजुर्डे यांच्या कारला अमरापूरकडून येणा-या स्कॉर्पिओ गाडीने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात अल्टो कारचालक अप्पासाहेब रंगनाथ गावंडे (वय ४० वर्षे, रा. चित्तेपिंपळगाव) आणि गंगुबाई गोरखनाथ झिंजुर्डे (वय ५५ वर्षे, रा. चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद) दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात पाच जण जखमी…
या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. ज्यात भक्ती बाबासाहेब झिंजुर्डे (वय ९ वर्षे), माधुरी गणेश झिंजुर्डे (वय ३० वर्षे), अमोल गोरखनाथ झिंजुर्र्डे (वय ३० वर्षे), गणेश गोरखनाथ झिंजुर्डे (वय ३५ वर्षे), तेजस गणेश झिंजुर्डे (वय दीड वर्ष) हे पाच जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या