16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeऔरंगाबादमाजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल; महिलेस मारहाण, व्हिडीओ व्हायरल

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल; महिलेस मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून, एका महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड शहर पोलिसात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जाधव यांच्या मैत्रीण असलेल्या ईशा झा नावाच्या महिलेने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली आहे. तर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओ म्हटले आहे की, आज हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली आहे. माझे केस पकडून जाधव यांनी मला मुक्का मार देत मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसात मी तक्रार दाखल केली असून, आता काय होईल याबाबत मला माहित नाही, असे ईशा झा यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

तर पुढे बोलतांना त्या म्हणाल्या आहेत की, आता मी दमले आहे, माझ्यावर नेहमी संशय केला जातो, माझे नावे प्रत्येकाशी जोडले जातात. घरात असलेल्या एका मुलाशी माझे संबध जोडण्याच प्रयत्न केला. मला वाटले होते ते बदलून जातील, मात्र तसे झालं नाही. मला खूप मारहाण केली असून, मी कन्नड सोडून जात आहे.

त्यामुळे यानंतर मी कधीच कन्नडमध्ये परतणार नसल्याचं देखील या व्हिडिओमध्ये ईशा झा यांनी म्हंटले आहे. याबाबत हर्षवर्धन जाधव यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या