23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत

शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सलग दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे शेत शिवारात पणी तर साचून राहिलेच पण शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अशा परस्थितीमध्ये शेतक-यांना मदत देणे गरजेचे आहे.

मात्र, शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकरी आत्महत्या आणि खरीप हंगामातील झालेले नुकसान पाहता विरोधकांकडून आता सरकारला धारेवर धरले जात आहे.

सरकारची मदत अपुरी, शेतक-यांची निराशा
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत असल्याचे आरोप पटोले यांनी केले आहेत. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. खताच्या किंमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतक-याला वा-यावर सोडले आहे. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायती, फळबागेसाठी १ लाख ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

शेतक-यांच्या परस्थितीकडे कानाडोळा
राज्यातील शेतक-यांची परस्थिती हा सरकारला देखील माहिती आहे. तब्बल दीड महिना पाऊस लागून राहिल्याने सर्वत्र पाणीच-पाणी अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ घोषित करुन भरीव मदत करणे गरजेचे आहे. शिवाय ही सर्व स्थिती सरकारला माहिती आहे असे असतानाही ओला दुष्काळ जाहिर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतक-यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार असल्याचा आरोप पटोले यांनी केले आहे.

आता गुन्हे कुणावर दाखल करावेत?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शिवाय दिवसेंदिवस याचे प्रमाणही वाढत असल्याने आता गुन्हे कुणावर दाखल करावेत असा प्रश्न पटोले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि शेतकरी आत्महत्या यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या