लातूर : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दि. २१ मे रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ९५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी या संस्थेतील २९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते व त्यातील २७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन १ व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आला आहे व एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे.
Read More तापमानात ही वाढ : सर्वाधिक तापामान अकोला येथे 44.7 अंश सेल्सिअस
पॉझिटीव्ह अहवाल आलेली व्यक्ती (वय 65) हि नाकाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झालेली होती. ऑपरेशनपूर्वी त्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला असता तो पॉझिटीव्ह आला आहे.
सध्या त्याच्यावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थिर आहे. सदरील व्यक्ती मागली ८ दिवसापूर्वी बिदर येथुन आलेली असून ती लेबर कॉलनी येथील आहे. अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.