22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाकार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयचे छापे

कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयचे छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजता ही धडक कारवाई केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरीत्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने यासंदर्भात कार्ती चिदंबरम आणि वडील पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओरिसा येथील सुमारे ९ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या जोरबाग आणि चेन्नई येथील निवासस्थानांवरही छापे टाकले आहेत.
सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, ‘मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? एक रेकॉर्ड असावे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, केंद्रीय तपास यंत्रणेने २०१०-१४ मध्ये गैरप्रकारे परदेशी निधी मिळवल्याचा आरोप करत कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सध्या कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरू आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हे प्रकरणांत अशांचा समावेश आहे. हा परदेशी निधी त्यांचे वडील पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना कार्ती यांना मिळाला होता. सीबीआयने १५ मे २०१७ रोजी आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर नोंदवला होता.
आयएनएक्स मीडिया समूहाकडून २००७ मध्ये विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मंजुरीमध्ये अनियमित व्यवहार करून ३०५ कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळवले असल्याचा आरोप आहे. कंपनीला परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हा पी. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या