35.2 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeराष्ट्रीयसत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांच्या घराची सीबीआयकडून झडती

सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांच्या घराची सीबीआयकडून झडती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे अनेकदा भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्यांच्या घराची सीबीआयकडून झडती सुरू आहे. वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, कथित विमा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी सीबीआय जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत नऊ ठिकाणी शोध घेत आहे. सत्यपाल मलिक यांना २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल बनवण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या