21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर

एमपीएससी परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील पेपर फुटीची प्रकरणे लक्षात घेता आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणा-या परीक्षेला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला. प्रश्नपत्रिका वाटल्यावर काही मिनिटांतच ती व्हॉट्सऍपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवरून बाहेर येणे, सामूहिक कॉपी याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाने ट्विटरच्या माध्यमातून दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२१ ला सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणा आधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणा-या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणा-या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

उमेदवारी रद्द करणार
उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. या अगोदर आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या