देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी : 60 दिवस झाले आहेत आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
नवी दिल्ली : देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशा होती की 21 दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल, परंतु आता 60 दिवस झाले आहेत आणि रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊनमधून अपेक्षित असं काहीच हाती लागलं नसल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
आम्हाला सरकारकडून मोठी अपेक्षा होती. परंतु सरकारने निराश केलं आहे. लॉकडाऊनचे चारही टप्पे अयशस्वी ठरले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ज्याप्रमाणे सूट देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे आता यापुढे प्लान बी कोणता असणार आहे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला केलाय. सरकारने जीडीपीच्या 10 टक्के पॅकेजच्या रुपात देण्यात आल्याचं सांगितलं, प्रत्यक्षात मात्र 1 टक्काचं मिळाला असल्याचं ते म्हणाले.
Read More 12 हजार रुपये पेंशन : एलआयसीने सुरू केली बंद झालेली सरकारची ही योजना
राहुल गांधी म्हणाले, लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले, परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला, की संपूर्ण जग लॉकडाउन हटवत असताना तेथील कोरोना केसेसे कमी होत आहेत. मात्र, आपल्याकडे केस वाढत आहेत. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला.
काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.
केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही. त्यामुळे राज्य सरकार योग्यरित्या काम करु शकत नसल्याचा आरोप राहुल गांधींना केला आहे. नेपाळ आणि लडाख मुद्द्यांवरही सरकारकडून पारदर्शकता नाही असं ते म्हणाले. त्याशिवाय मजूर, गरिबांना कशी मदत कराल, असा सवालही राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे.
LIVE: Special Congress Party briefing by Shri @RahulGandhi via video conferencing. #RahulGandhiVoiceOfIndia https://t.co/L3m5XFYFPE
— Congress (@INCIndia) May 26, 2020