26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeलॉकडाऊन दरम्यान पूर्ण पगार देण्याचा आदेश केंद्र सरकारकडून मागे

लॉकडाऊन दरम्यान पूर्ण पगार देण्याचा आदेश केंद्र सरकारकडून मागे

एकमत ऑनलाईन

सर्वाधिक फटका हा लाखो कामगारांना बसणार : कंपन्या आणि उद्योगांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

नवी दिल्ली: सरकारने लॉकडाऊन दरम्यान कर्मचार्‍यांना पूर्ण पगार देण्याचा आपला जुना आदेश मागे घेतला आहे. यामुळे कंपन्या आणि उद्योगांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका हा लाखो कामगारांना बसणार आहे. देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जारी झाल्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे २९ मार्च रोजी गृहसचिवांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कंपन्या व इतर उद्योग व्यवसायिकांना स्पष्ट केलं होतं की, कोणत्याही कपातीशिवाय आपल्या कर्मचार्‍यांना पूर्ण वेतन देण्यात यावे.

Read More  उत्तर प्रदेशात मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशभरात लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. आता जवळजवळ दोन महिने होत आले तरीही लॉकडाऊन कायम आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा सोमवारपासून सुरू झाला आहे.गृहसचिव अजय भल्ला यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Read More  गुजरातमध्ये २५०० कैद्यांची सुटका

….कंपनी बंद असली तरी त्यांना पगार देणं अनिवार्य होतं
रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये सहा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. यापैकी बहुतेक नियम हे लोकांच्या प्रवासाशी निगडीत आहे. यामध्ये गृह सचिवांनी २९ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशाचा (संपूर्ण पगाराविषयी) समावेश नाही. २९ मार्चच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं की, सर्व कंपन्यांनी लॉकडाऊन दरम्यान कोणतीही कपात न करता आपल्या कामगारांना संपूर्ण वेतन द्यावे. भले लॉकडाऊन दरम्यान, त्यांची कंपनी बंद असली तरी त्यांना पगार देणं अनिवार्य होतं.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या