22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआमदार गोपीचंद पडळकरांना केंद्राची एक्स दर्जाची सुरक्षा

आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्राची एक्स दर्जाची सुरक्षा

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्र सरकारची दर्जाची सुरक्षा देण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच यापूर्वी त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा दिली आहे.

गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीकडून हल्ले झाले आहेत, त्यामुळे त्यांना ही सुरक्षा देण्यात आली. किरीट सोमय्या यांनाही याच दर्जाची सुरक्षा देण्यात आली. यावर काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी टीका केली की, आधी हेच लोक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात त्यानंतर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते. दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत, किरीट सोमय्या, आमदार नवनीत राणा आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनाही केंद्रातर्फे सुरक्षा पुरवण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या