22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसीईटी : परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ८ जूनला संपणार

सीईटी : परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ८ जूनला संपणार

एकमत ऑनलाईन

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना सीईटीसाठी अर्ज भरण्यास अडचणी आल्या होत्या. त्यानंतर मुदतवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा मुदतवाढ केली असून त्याची मुदत ८ जूनला रात्री संपत आहे, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.

राज्य शासनाच्या जवळपास आठ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास दोन दिवसांची मुदत अद्यापही शिल्लक आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ८ जूनला संपणार आहे. सीईटी परीक्षा १५ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत.

या परीक्षेसंदर्भात माहिती राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Read More  बजाज हे कोरोना किंवा मेडिकल एक्स्पर्ट नाहीत : देवेंद्र फडणवीस

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या