22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रआरेतील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टात आव्हान

आरेतील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टात आव्हान

एकमत ऑनलाईन

मुंबई : आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर वर्ग केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठविल्याने मुंबई मेट्रोचा आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उठवली. त्यामुळे हा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला आहे.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आणि झाडे तोडली जाणार आहेत. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

आरे येथील झाडे वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणवादी संघटना पुढे आल्या होत्या. त्यांच्याकडून आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे कारशेडच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला. परंतु आता यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, यावर सर्व बाबी अवलंबून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या