पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या सालामीवीर कुसल मेंडीस आणि निसंका या सलामी जोडीन ८.२ षटकात तब्बल ८० धावा ठोकत दमदार सुरूवात केली. अखेर अर्शदीपच्या नो बॉल आणि फ्री हिटमधून चहलने सावरले. त्याने ३१ चेंडूत ५१ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या कुसल मेंडीसला बाद केले. उमरान मलिकने श्रीलंकेची अवस्था ६ बाद १३८ धावा केली होती. मात्र शेवटच्या ४ षटकात कर्णधार दसुन शानकाने चेंडूत अर्धशतक ठोकत लंकेला २०० पार पोहचवले. त्याच्या याच २२ चेंडूत केलेल्या ५६ धावांच्या जोरावर लंकेने भारतासमोर २०६ धावांचा डोंगर उभारला.
यानंतर उमरान मलिक आणि अक्षर पटेल यांनी लंकेची मधली फळी उडवण्यास सुरूवात केली. अक्षर पटेलने दोन विकेट्स घेतल्या. मात्र उमरान मलिकने 19 चेंडूत 37 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या चरीथ असलंकाला बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने वानिंदू हसरंगाचा देखील त्रिफळा उडवला.