27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयबुधवारी राज्यात आणि गुजरात किनारपट्टीवर वादळाची शक्यता

बुधवारी राज्यात आणि गुजरात किनारपट्टीवर वादळाची शक्यता

- हवामान खात्याचा अंदाज

एकमत ऑनलाईन

कोलकाता: वृत्तसंस्था
अम्फान या महाचक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवल्यानंर १० दिवसांनंतर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. अरबी समुद्रामध्ये पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होणार असल्याने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये ३ जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये अरबी समुद्रात दोन वादळे तयार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यातील एक वादळ आफ्रीकी किनाºयापासून ओमान आणि येमेनच्या दिशेने जाईल तर दुसरे वादळ भारताजवळच तयार होत आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्राच्या आग्नेय-पूर्व-मध्य-प्रदेशात येत्या ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. पुढील ४८ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ ३ जूनपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल.

विशेष म्हणजे, १० दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातून आलेल्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मोठे नुकसान झाले. अम्फान या महाचक्रीवादळामुळे ८६ लोक ठार झाले.तर, लाखो लोक बेघर झालेले आहेत.

Read More  सुनेकडून घरातील काम करून घेणं सामान्य बाब -केरळ हायकोर्ट

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या