37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयचंदीगडमध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची संख्या

चंदीगडमध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची संख्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ५ (एनएफएचएस) अहवालानुसार चंदीगडमध्ये भारतातील सर्वात जास्त श्रीमंत लोक आहेत. चंदीगडमधील ७९ टक्के लोकसंख्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते. चंदीगडनंतर दिल्ली (६८%) आणि पंजाब (६१%) यांचा क्रमांक लागतो.
भारतात सर्वाधिक श्रीमंत लोक हे शहरी भागात राहतात. केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक संपत्ती असणारी आहे. तर, झारखंड (४६%), बिहार (४३%) आणि आसाम (३८%) ही सर्वात कमी संपत्ती असलेल्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी असलेली राज्ये आहेत.

श्रीमंतीमध्ये हिंदूंपेक्षा मुस्लिमांची संख्या जास्त
धर्मनिहाय डेटा दर्शवितो की, देशात हिंदू आणि मुस्लिमांकडे सर्वात कमी संपत्ती आहे. भारतात १९.१% हिंदू आणि १९.३% मुस्लिम सर्वाधिक संपत्तीच्या श्रेणीत येतात. अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील ७१ टक्के लोकसंख्या आणि अनुसूचित जातीच्या कुटुंबातील ४९ टक्के लोकसंख्या सर्वात कमी संपत्ती असणा-यांमध्ये आहे. भारतातील धार्मिक समुदायांमध्ये जैन हे सर्वात श्रीमंत आहेत, त्यांच्या लोकसंख्येपैकी ८०% पेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते. शीख समुदाय देखील श्रीमंत आहे. त्यांच्या लोकसंख्येपैकी ५९.१% लोकसंख्येच्या सर्वाधिक संपत्तीमध्ये येते.

मोटारसायकल वाहतुकीला प्राधान्य
शहरी भागात वाहतुकीचा प्राधान्यक्रम मोटारसायकल आहे. शहरी लोकसंख्येपैकी ६०.६% लोक या मार्गाने प्रवास करतात, त्यानंतर ४३% सायकलवरून आणि फक्त १३.८% शहरी भारतातील लोक कारने प्रवास करतात. ग्रामीण भारतात, स्वत:च्या मोटार सायकल ४.४% आणि ५४.२% वर सायकलींना प्राधान्य दिले जाते.

मोबाईलचा वापर वेगाने वाढतोय
मोबाईलचा वापर देशभरात अगदी झपाट्याने वाढत गेला आहे. भारतात ९६.७% शहरी रहिवासी आणि ९१.५% ग्रामीण रहिवासी मोबाईलचा वापर करतात. या अनुषंगाने, लँडलाईनचा वापर शहरी भागात फक्त ४.६% आहे आणि ग्रामीण भागात १.१% इतका कमी आहे.

भारतात पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा
भारतातील जवळपास ९९% शहरी कुटुंबांना तर ९५% ग्रामीण कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे सुधारित स्त्रोत उपलब्ध आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या