36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमनोरंजन‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ

‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक समीक्षक, कलाकार या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहेत. चंद्रमुखी हा चित्रपट गेल्या २९ एप्रिलला प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाच्या पाच दिवसांचे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी शनिवारी ३० एप्रिलला या चित्रपटाने १.३२ कोटींचा गल्ला जमवला.
यानंतर रविवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.०९ कोटींची कमाई केली आहे. चंद्रमुखी या चित्रपटाच्या कमाईत सोमवार २ मेपासून काहीशी घट पाहायला मिळाली. या चित्रपटाने सोमवारी २ मे रोजी ८० लाखांची कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी या चित्रपटाने ९८ लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात या चित्रपटाने जवळपास ६.२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने ंिजकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या