30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रवातावरणात बदल: सर्दी, खोकला, तापाने पुणेकर त्रस्त

वातावरणात बदल: सर्दी, खोकला, तापाने पुणेकर त्रस्त

एकमत ऑनलाईन

पुणे : मागील दोन आठवड्यापासून पुण्यातील वातावरणात बदल होत आहेत. रात्री तापानात घट आणि दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वातावरणाच्या बदलामुळे पुणेकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मागील काही दिवसांपासून डॉक्टरांकडे संसर्गाच्या अनेक तक्रारी आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दोन महिन्यांपासून पुण्यातील वातावरणात चढउतार सुरु आहेत. दर आठवड्यात तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम दिसून लागले आहे. मागील आठवड्यापासून हवामानात आणि पुण्यातील हवेत बदल झाले आहे. पुण्यातील हवाही प्रदूषित झाली आहे.

या दोन्ही कारणामुळे निम्मे पुणे आजारी असल्याचं समोर आलं आहे.
वातावरणात घट झाल्याने पुणेकरांना कोरडा खोकला, सर्दी, ताप, उलट्या अशा अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. दरवर्षी ऋतू बदलामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ होते. घरात एकाला संसर्ग झाला की कुटुंबातील सगळ्यांना संसर्ग होतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक रुग्ण
वातावरण बदलाचा जास्त परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर जास्त प्रमाणात होत आहे. त्यांना सर्दी खोकल्या बरोबरच अपचन आणि उलट्यांच्या तक्रारी डॉक्टरांना आल्या आहेत. लहान मुलांच्या आरोग्यात काही तक्रारी आढळल्यास तातडीने डॉक्टरांना सल्ला घ्या आणि तातडीने उपचार करा, असंही डॉक्ट

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या