सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार
मुंबई : गेले नऊ दिवस गुवाहाटी मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा मुक्काम आता गोव्यात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या गुवाहाटी ‘एक्झिट प्लॅन’ तयार असून आज दुपारीच गोव्याला रवाना होणार होते.
मात्र आता या प्लॅनमध्ये बदल झाला असून सुप्रीम कोर्टातील निकालानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांचा गट आज गुवाहाटीवरून गोव्याला रवाना होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विशेष विमान गुवाहाटील पोहोचणार आहे. त्यानंतर हे सर्व आमदार रात्री गोव्यात पोहोचणार आहेत . एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याठिकाणी ७१ रुम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. मुंबईपासून जवळ असल्यानं आमदारांना गोव्यात ठेवण्यात येणार आहे.