24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमनोरंजनपूनम पांडेविरोधात आरोपपत्र दाखल

पूनम पांडेविरोधात आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : गोव्यात न्यूड फोटोशूट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे आता कायद्याच्या कचाट्यात फसत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूनम पांडेविरोधात गोवा पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. २०२० मध्ये पूनम पांडेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तिच्यावर आरोप होता की तिने चपोली डॅमवर अश्लील व्हीडीओचे शूटिंग करून नियमांचं उल्लंघन केलं आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणात पूनम पांडेव्यतिरिक्त तिचा पती सॅम बॉम्बेचे नाव देखील सामिल केले आहे.

पूनम पांडे आपला पती सॅमसोबत २०२० मध्ये कानकोना येथे फिरण्यास गेली होती. तिथे पूनम पांडेवर आरोप लावले आहेत की, सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हीडीओ तिने शूट केले. तसेच, डान्स देखील केला ज्यामुळे तिथे उपस्थित अन्य पर्यटकांना त्याचा त्रास झाला. एवढेच नाही, तर पूनम पांडेने त्या व्हीडीओला इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले होते जो व्हीडीओ व्हायरल देखील झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या