36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल

मनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसुख हिरेन यांचे कुटुंब आता थोडे स्थिरावले आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. मनसुख हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते, त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणा-यांची चौकशी केली पाहिजे. पुढच्या आठवड्यात मी एनआयएच्या वरिष्ठ अधिका-यांशी भेटणार असून आता एकच चार्जशीट दाखल झाली आहे, यापुढे अजून होऊ शकतात, हिरेन प्रकरणात कोण कोणते अधिकारी होते ते उघड करणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

गेली अनेक वर्षे माफिया सेना ठाणे महापालिकेत सत्तेत आहे. अनेक वर्ष घोटाळे झाले, आता गेल्या पाच वर्षात जे घोटाळे झाले, त्याची एक काळी पुस्तिका भाजपा काढणार आहे. मुंबई प्रमाणे ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार आहे. ५० प्रकारचे घोटाळे आहेत, ते सर्व नागरिकांसमोर आम्ही आणू,असा इशारा त्यांनी दिला.

राणांना तुरुंगात टाकण्याची पांडेंकडून सुपारी ?
दरम्यान, राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार ना?, त्यामुळे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे. नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? नगराळे यांची बदली का केली गेली?,’’ असे अनेक प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या