श्रीरामपूर : राज्यात ६०० रुपये ब्रासने वाळू उपलब्ध झाल्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे घरांच्या किमतीही कमी होऊन सामान्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोघा जणांना वाळूची विक्री करण्यात आली. त्यानंतर विखे हे
पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पूर्वी सहा हजार रुपये ब्रासने वाळू विकली जात होती. त्यामुळे बांधकामाचे दर गगनाला भिडले होते. आता वाळूचे भाव ६०० रुपये ब्रासपर्यंत खाली आल्याने फ्लॅटचे दर कमी होतील. यासाठी आपण राज्यातील इंजिनीअर, बिल्डर यांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत.