36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडादिल्लीविरुद्ध चेन्नईचा मोठा विजय

दिल्लीविरुद्ध चेन्नईचा मोठा विजय

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : धडाकेबाज फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने दिल्लीवर तब्बल ९१ धावांनी विजय साकारला. या विजयासह आता गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. कारण या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ हा सहा गुणांसह नवव्या स्थानावर होता. पण या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर मोठा विजय साकारला आणि त्यामुळेच त्यांचा रनरेटही सुधारला आहे. या विजयानंतर चेन्नईच्या संघाचे आठ गुण झाले आहेत आणि केकेआरच्या संघाचेही आठ गुण आहेत. पण चेन्नईच्या संघाने मोठा विजय साकारल्याने त्यांचा रनरेट वाढला आणि त्या जोरावर त्यांनी आठवे स्थान पटकावले आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली. दिल्लाचा कर्णधार ऋषभ पंतने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयÞ घेतला. पण त्याचा हा निर्णय चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांनी चुकीचा असल्याचे दाखवून दिले. चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने या सामन्यात आपले सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. धडाकेबाज फटकेबाजी करत कॉनवेने २८ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. धडाकेबाज फटकेबाजी करत असतानाच चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला.

ऋतुराजने यावेळी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. डेव्हॉन कॉनवेने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईला दमदार सुरुवात करून दिली. कॉनवेने यावेळी ४९ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ८७ धावा फटकावल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकात धडाकेबाज फटकेबाजी केली आणि ८ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावल्या. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला २०८ धावांपर्यंत मोठी मजल मारता आली.

चेन्नईच्या २०९ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नरच्या रुपात दिल्लीच्या संघाला यावेळी मोठा धक्का बसला. वॉर्नरला यावेळी १९ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दिल्लीच्या एका फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. चेन्नईकडून मोईन अलीने अचूक आणि भेदक मारा करत ४ षटकांमध्ये फक्त १३ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाची घसरगुंडी झाली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या