34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रएच३एन२ विषाणूचा छत्रपती संभाजीनगर शहरात शिरकाव

एच३एन२ विषाणूचा छत्रपती संभाजीनगर शहरात शिरकाव

एकमत ऑनलाईन

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात दिवसेंदिवस एच३एन२ विषाणूचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे देशात एच३एन्२ मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. व्हायरल इन्फ्लूएंझा म्हणजेच एच३एन२ विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. दरम्यान आता एच३एन२ विषाणूने छत्रपती संभाजीनगर शहरात देखील शिरकाव केला आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोना संसर्गाची लाट येणार म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. पण कोरोना साथ आलीच नाही, असे असले तरी आता वातावरणातील बदलामुळे घराघरांत ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. एच३एन२ या व्हायरसचे हे रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने राज्यांना सतर्क केले आहे. विशेष म्हणजे मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या व्हायरसचे शिकार बनले आहेत.

शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

लक्षणे
हा विषाणू सामान्यत: डुकरांमध्ये पसरतो आणि मानवांमध्ये संक्रमित होतो. त्याची लक्षणे हंगामी फ्लूसारखीच असतात. एच३एन२ विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि श्वसन संसर्गाची लक्षणे दिसतात. खोकला किंवा नाक वाहणे तसेच अंगदुखी, मळमळ, उलट्या किंवा अतिसार यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या