20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home लातूर मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री अमित देशमुख

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री अमित देशमुख

माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमाचा शुभारंभ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येत नसल्याने भारत सरकारने पोलीस कारवाई करुन १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त केला व या लढ्यामुळे भारतीय स्वातंत्र्यला खºया अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. या लढ्यात ज्या थोर वीरांनी आपले जीवन समर्पित केले त्या थोर हुतात्म्यांना अभिवादन करुन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकार, अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंखे,  महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंर्त्य सैनिकांनी स्वातंर्त्य लढा उभा करुन मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व शहिदांना अभिवादन करून आपण सर्वजण आजच्या या शुभदिनी विकासासाठी एकत्रित आले पाहिजे. राज्य शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आपला कोविड-१९ विरोध चा लढा संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने  कोविड-१९ संसर्ग वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी महाराष्ट्र राज्य कोविड -१९ मधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्याच्या प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोवीड मुक्त राज्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची आहे. लातूर जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ झालेला असून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा, पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली. आज संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा हा समारंभ उत्साहाने

साजरा होत आहे. या समारंभास उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच आॅनलाइन प्रेक्षपणाद्वारे हा समारंभ साजरा करणारे स्वातंर्त्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता,विद्यार्थी-पालक पत्रकार बंधू-भगिनींना पालकमंत्री देशमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंखे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनीही हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस पथकाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच पोलीस बँड पथकाने यावेळी मानवंदना दिली.

त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्याकडून समारंभास उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी व मान्यवरांच्या  भेटी घेऊन सर्वांना मराठवाडा मुक्ति दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथका मधील आशा वर्कर्स यांना प्रतिनिधिक स्वरुपात सुरक्षा किट व नागरिकांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय किटचे वितरण पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते येथे करण्यात आले.  त्याप्रमाणेच लातूर महापालिकेचे अंतर्गत बेघर व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा धनादेशाचे वितरण झाले. तर कोरोना काळात चांगली सेवा बजावलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स इत्यादींना कोरोना योद्धा म्हणून श्री देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शुभारंभ

राज्यात १५ सप्टेंबर २०२० पासून कोविड मुक्त महाराष्ट्र साठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आज टाऊन हॉलच्या प्रांगणात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महापालिका हद्दीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या समारंभास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रित लाक प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ उद्धव फड यांनी केले.

 

 

ताज्या बातम्या

कोरोनामुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली : सध्या कोरोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचे दिसत आहे. क्रेडिट...

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

आणखीन बातम्या

कोरोनामुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली : सध्या कोरोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचे दिसत आहे. क्रेडिट...

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...