25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसरन्यायाधीश-मुख्यमंत्री शिंदे एका मंचावर ; विरोधक संतापले

सरन्यायाधीश-मुख्यमंत्री शिंदे एका मंचावर ; विरोधक संतापले

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा कार्यक्रम काल पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधी पक्षाकडून टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या सरकारच्या अस्तित्वाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना त्यांनी सरन्यायाधीशांसोबत एका मंचावर दिसणे अनेकांना रुचलेले नाही.

मुंबईतल्या ‘ताज पॅलेस’मध्ये काल सरन्यायाधीशांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेही हजर होते. ते मंचावर उपस्थित होते. यावरून आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली जात आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मुख्यमंत्र्यांवर अशीच टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरपणा स्वत: सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासले जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर त्याचे नेतृत्व करणा-या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते, तेव्हा व्यासपीठ असे विसंगत दिसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या