23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट

मुख्यमंत्र्यांनी टाळली संभाजीराजेंची भेट

एकमत ऑनलाईन

दीड तास होते दालनाबाहेर उभे, राजे तसेच परतले माघारी !
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजीराजे आक्रमक झाले आहे. याच मुद्यावर संभाजीराजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट टाळली असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दीड तास संभाजीराजे यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर ताटकाळत उभे राहावे लागले होते.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालय येथे आले होते. संभाजीराजे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली आणि आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या