28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री नतमस्तक

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री नतमस्तक

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

अनेक दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी १६४ सदस्यांचा पाठिंबा मिळवित बहुमत चाचणी जिंकली. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. अशा पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यां्या दादर येथील स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळानंतर शिंदे यांनी त्यांचे गुरू आणि दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. त्यानंतर तेथून शिंदे थेट ठाण्यात दाखल झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मुलगा खा. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आणि इतर समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे स्वागत केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या