27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजपासून दोन दिवसीय दिल्ली दौ-यावर

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आजपासून दोन दिवसीय दिल्ली दौ-यावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर रविवारी नीती आयोगाच्या बैठकीमध्येही सहभागी होतील. या दोन दिवसांच्या दौ-यात दिल्लीतील नेत्यांशी गाठीभेटी घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

यंदा देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच रविवारी नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीलाही देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

राज्यात नवीन सत्ता स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळत नाही. त्यातच राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या ८ तारखेला महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीमुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवण्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौ-यावर आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या