27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली गजानन कीर्तीकरांची भेट

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली गजानन कीर्तीकरांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यांनंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

दिल्ली दौ-यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिंदेंच्या या अचानक भेटीने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

त्यामुळे कीर्तीकरही शिंदे गटात सामील होणार का? अशी चर्चा रंगली आहे. सध्या कीर्तीकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या