23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे यांचा भुजबळांना दणका

मुख्यमंत्री शिंदे यांचा भुजबळांना दणका

एकमत ऑनलाईन

नाशिक : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ याना चागंलाच दणका दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या ५६७ कोटींच्या कामांना ब्रेक देऊन इतक्या घाईत कामांना मंजुरी कशासाठी असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. यानंतर एकनाथ शिंदे अ‍ॅक्टिव्ह झाले असून पहिलाच दणका त्यांनी भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कामांना मंजुरी दिली होती.

मात्र या निधी वाटपावरून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्षही पाहायला मिळाला होता. हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडेही गेला होता. त्यामुळे आता नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी सुहास कांदे यांच्या तक्रारीनंतर थेट या कामांनाच ब्रेक लावल्याने खळबळ उडाली आहे.

छगन भुजबळ पालकमंत्री असताना जिल्ह्यातील कामांकरिता निधी वाटप करण्यात आला. या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भुजबळ आणि कांदे वाद चव्हाट्यावर आला होता. छगन भुजबळ हे ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला होता.

तसेच निधी वाटपावरून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर ५६७ कोटींच्या कामांना ब्रेक लावून घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल नाशिकच्या जिल्हाधिका-यांना केला आहे.

दरम्यान नव्या सरकारमध्ये असणा-या सुहास कांदे यांनी निधी वाटपाचा हा वाद तक्रारीद्वारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट या कामांनाचं ब्रेक लावल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे.

नव्या सरकारचा दुसरा धक्का
नव्या सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी हा दुसरा धक्का दिला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या