21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला दिल्लीतून हिंगोली पुराचा आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला दिल्लीतून हिंगोली पुराचा आढावा

एकमत ऑनलाईन

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौ-यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजपा पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, राज्यात हिंगोली जिल्ह्यात आसना नदीला पूर आल्याची स्थिती आहे.

या परिस्थितीचा आढावा एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. त्यांचा व्हीडीओही समोर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौ-यावर असून हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पुराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिका-यांकडून त्यांनी फोनद्वारे घेतली.

पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही याला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रवासात असतानाच शिंदेंनी जिल्हाधिका-यांना फोन करत हा आढावा घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासांत आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कयाधु, आसना, जलेश्वर या नद्यांना पूर आला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुरुंदा मंडळात १७९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या