26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

एकमत ऑनलाईन

मुंबई : सततच्या दौ-यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दौरे आणि बैठका घेतल्या आहेत.

त्याचबरोबर पहाटेपर्यंतच्या सभा, पूरग्रस्त भागाची पाहणी आणि प्रवास या सर्वामुळे त्यांना थकवा आल्यामुळे आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यात होणा-या सर्व प्रशासकीय बैठका आणि सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या