22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या पाकिटावर मुख्यमंत्री शिंदेंचे नाव

राऊतांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या पाकिटावर मुख्यमंत्री शिंदेंचे नाव

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून ११ लाखांची रोकड सापडली आहे. यापैकी १० लाखांची रक्कम असलेल्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. जवळपास १६ तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे. राऊतांच्या भांडुप येथील घरातून ईडीने ११ लाखांची रोकड जप्त केली आहे. या ११ लाखांपैकी १० लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची खळबजनक माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.

या प्रकरणी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, असे असण्याची शक्यता आहे की एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यांना जे काही करायचे आहे, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचे असेल आणि म्हणून त्यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील. त्यामुळे प्रत्येक पैशाचा सोर्स दाखवावा लागतो, त्यांनी तो दाखवावा.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या