मुंबई : राज्यात राजकीय संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिली आहे.
तसेच, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं असं म्हटलं होतं.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी बोलताना सांगितलं की, काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी विधानसभा बरखास्त करण्याचा आमचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, पुढे आम्ही पूर्ण ताकदीनं सरकार चालवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.