23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पवार यांच्यात खलबते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पवार यांच्यात खलबते

एकमत ऑनलाईन

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राज्यसभेची निवडणूक हा प्राथमिक आणि महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा असल्याचे समजते. राज्यसभेची निवडणूक आगामी काळात येऊ घातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या निवडणुकीबाबत घोषणादेखील झाली आहे. येत्या १० जूनला राज्यसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जेव्हा भेट होते, तेव्हा अनेक राजकीय अभ्यासक, पत्रकारांचे लक्ष या भेटीकडे असते. त्यांच्यात सातत्याने विविध मुद्यांवर चर्चा होते. अर्थात, काही चर्चा या सरकार आणि महाविकास आघाडीशी संबंधित असल्याने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाहीत. पण तरीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये धुसफूस असल्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आतादेखील झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

१० जून रोजी राज्यसभा निवडणूक
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला मतदान होणार आहे. ३१ मेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या तीन जागा आहेत. भाजपच्या दोन जागा निश्चित आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे, तर सहावा उमेदवार कुणाचा ठेवणार, त्याला कसे निवडून आणायचे, याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या