27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना फोन

मुख्यमंत्र्यांचा अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना फोन

एकमत ऑनलाईन

अमरावती: जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची प्रकृती खराब झाली होती.

या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची बातमी कळताच दिल्ली दौ-यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिका-यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला.

या सर्वांवर तातडीने उपचार करावेत. तसेच, गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली.

यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळतील, तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या