Saturday, September 23, 2023

३१ जुलैनंतरच्या लॉकडाउन शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जाणार असल्याची माहिती दिली. याविषयी एका इंग्रजी वर्तमानपत्राने माहिती दिली आहे.

‘मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाउन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

३१ जुलैनंतरचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. ‘निर्बंध शिथील होतील तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे एक अधिकाऱ्याने म्हटले आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकार जीम, रेस्तराँ आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासाटी परवानगी देईल असं वाटत नाही. तसंच शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. शेवटी हा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आहे.

Read More  ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक’ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या