22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही ; किरीट सोमय्यांचा दावा

अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही ; किरीट सोमय्यांचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही केल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. त्यामुळे अनिल परब यांचे रत्नागिरीतील रिसॉर्ट दिवाळीपर्यंत इतिहासजमा होणार असल्याचे सोमय्या म्हणाले. २४ ऑगस्ट रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केल्याचे ते म्हणाले. सोमय्यांनी केलेला दावा हा अनिल परबांसाठी धक्का मानला जात आहे.

दरम्यान, आता पर्यावरण मंत्रालयकडे ही फाईल गेली आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिर्का­यांना आदेश दिले जाणार असल्याचे मला सांगितल्याचे सोमय्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी हे त्यांच्या अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती देखील सोमय्यांना दिली. शनिवारी मी दापोलीला यात्रा करणार आहे. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा रिसॉर्ट इतिहासजमा होणार आहे. रिसॉर्ट पडणार शिवाय या रिसॉर्टसाठी लावलेले पैसे कोठून आले याची देखील तपासणी होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं.

सोमय्यांचे आरोप काय
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च २०२२ महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने ३१ जानेवारी २०२२ रोजी हा रिसॉर्ट ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते.

१२ मार्च २०२१ रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँंिड्रगचा आरोप करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या