27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्र्यांचा दिल्ली मुक्काम एका दिवसाने वाढला, पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली मुक्काम एका दिवसाने वाढला, पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी काल (२१ सप्टेंबर) रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची भेट होणार का, झालीच तर भेटीत काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे. याशिवाय राज्यातल्या राजकारणावर दिल्लीत खलबतं होणं स्वाभाविक आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौ-यानुसार ते काल रात्रीच मुंबईला येणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी स्वत:हून हा मुक्काम एक दिवसाने वाढवला आहे, त्यामुळे चर्चा आणि शक्यतांचा पूर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा मुक्काम अचानक का वाढवला? त्यामागे पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचे कारण तर नाही ना? जर मुख्यमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना थेट भेटणार असतील तर त्यांना आता देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची रात्री भेट
दरम्यान, दिल्ली दौ-यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे कळते. मात्र या बैठकीतील तपशील समोर आलेला नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि वेदांता-फॉक्सकॉन वादाच्या मुद्यांवर ही चर्चा झाली असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या