24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयसप्टेंबरमध्ये मुलांना लस मिळण्याची शक्यता

सप्टेंबरमध्ये मुलांना लस मिळण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या तिसºया लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसºया लाटेबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात येऊ शकते. तसेच या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळणार असल्याची शक्यता आहे, असे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. डॉ. गुलेरिया म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या फेज टू आणि थ्रीच्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते. एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. १२ मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज टू आणि थ्री चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

लहान मुलांना गंभीर आजाराची माहिती चुकीची
कोरोनाच्या तिसºया लाटेत लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होतील असे सांगितले जात आहे. दरम्यान एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कोरोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोरोना लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते.

मुलांसंदर्भात कोणताही डेटा उपलब्ध नाही
देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही ज्यामध्ये कोरोना लाटेत मुले गंभीर संक्रमित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी यावेळी दिली.

नामांकीत डिझायनर ईडीच्या रडारवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या