नवी दिल्ली : वृत्तसंस्था –चीनच्या विरोधात सर्व ताकदीने एकवटून लढण्यासाठी आता भारतीय तयार आहेत. मोबाइल क्षेत्रात चीनला चारीमुंड्या चीत करण्याची तयारी भारताने केली आहे. तसेच रेल्वेचे दोन प्रकल्प चीनी कंपन्यांना मंजूर झाले होते. त्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्याच निर्णयाच्या विरोधात आता चीन थेट दिल्ली हायकोर्टात गेला आहे.
ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तयार करण्याचे ४७१ कोटी रुपयांचे कंत्राट
कानपुर आणि मुगलसराय यांच्या दरम्यान ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तयार करण्याचे ४७१ कोटी रुपयांचे कंत्राट चीनच्या बीजिंग नैशनल रेलवे रिसर्च ऐंड डिजायन इंस्टिट्यूट यांना मिळाले होते. तेच कंत्राट भारतीय रेल्वेने रद्द केले आहे. तसेच या प्रकल्पासाठी जागतिक बँक यांच्याकडून अर्थसाह्य न घेता स्वत: असा प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. याच निर्णयाच्या विरोधात चीन्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
Read More एसटी बस भरती टप्याटप्यात करणार -परिवहन मंत्री अनिल परब