24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयचीनला चांगल्या प्रशिक्षणाची गरज

चीनला चांगल्या प्रशिक्षणाची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे. लाईन ऑफ अ‍ॅक्च्यूअल कंट्रोलवर गलवान खो-यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला त्यांना अजून तयारीची आणि चांगल्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे जाणवले, असे मोठे वक्तव्य चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी बुधवार दि़ २३ जून रोजी केले.

चिनी सैनिक हिमालयाच्या टेकड्यांवर लढाईसाठी सक्षम नाहीत आणि ते दीर्घ कालावधीसाठी सामनाही करू शकत नाहीत, असे रावत म्हणाले. भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या सैनिकांनी तैनातीमध्ये बदल केला आहे. ज्या प्रकारे गलवान आणि अन्य ठिकाणी त्यांचा सामना भारतीय लष्कराशी झाला, त्यावरून त्यांना आणखी प्रशिक्षणाची गरज असल्याचे जाणवले आहे, असे त्यांनी नमूद केले.

चिनी सैनिकांना अनुभव कमी
चिनी सैनिक हे छोटी लढाई लढू शकतात. त्यांच्याकडे या भागात लढाईचा अनुभव नाही. भारत चीनच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे, असे रावत यांनी गलवान खो-यात झालेल्या झटापटीदरम्यान चिनी सैन्याला झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना सांगितले.

भारतीय लष्कराची उत्तम तयारी
भारतीय लष्कराच्या जवानांनी उत्तम तयारी केली आहे. डोंगराळ भागांमध्ये आपले लष्कर हे चिनी लष्कराच्या तुलनेत उत्तमच आहे. लष्करासाठी वेस्ट आणि नॉर्थ फ्रन्ट दोन्ही आवश्यक आहे. नॉर्दन फ्रन्टमध्ये सध्या काही हालचाली वाढल्या असल्याचेही रावत यांनी नमूद केले.

दिवाळीपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या