शांघाय : सध्या जागतिक पातळीवरील राजकारण आणि देवाणघेवाण या संदर्भात एक वेगळी बातमी समोर येत आहे. चीनने रशियाला मदतीचा हात देत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात सुरु केली आहे.
सौदी अरेबियाला मागे टाकत रशिया चीनचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.
त्यामुळे चीनचा रशियन तेल आयातीचा दर वाढून ५५ टक्क्यांसह विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे मॉस्कोने बीजिंगला सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची विक्री केली.
सौदी अरेबियाला मागे टाकत आता रशिया चीनला सर्वाधिक तेल पुरवठा करणारा देश बनला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे मागणी कमी होऊनही चीनने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली असल्याची माहिती मिळत आहे.