काठमांडू : गुप्तचर उपग्रह अवकाशात घेऊन जाणा-या चिनी रॉकेटचा शनिवारी नेपाळच्या हवाई क्षेत्रात स्फोट झाला. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अशीच एक घटना घडली होती.
अंतराळतज्ज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांच्या मते या रॉकेटचे नाव चांग झेंग २ डी लाँग मार्च असे होते. हे गेल्या वर्षी २९ जुलै रोजी मध्य चीनमधील शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. सोबत तीन लष्करी टेहळणी उपग्रह होते.
हे उपग्रह सध्या अवकाशात सक्रिय आहेत. अशा उपग्रहांचा उपयोग इतर देशांच्या लष्करावर नजर ठेवण्यासाठी केला जातो. ८ मार्च रोजी चीनमधील याच केंद्रातून प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचा अमेरिकेतील टेक्सासच्या हवाई क्षेत्रात स्फोट झाला. या रॉकेटने दक्षिण चीन समुद्रावर नजर ठेवण्यासाठी तीन उपग्रह अवकाशात सोडले होते.