31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअँटिव्हायरसच्या नावाखाली चिनी हॅकर्स इन्स्टॉल करतायेत मालवेअर

अँटिव्हायरसच्या नावाखाली चिनी हॅकर्स इन्स्टॉल करतायेत मालवेअर

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चिनी सरकारशी संबंध असणारे काही हॅकर्स मॅकफी या अँटिव्हायरसच्या नावाखाली युझर्सच्या कंप्युटर्समध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्यास भाग पाडत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

गीटहब आणि ड्रॉपबॉक्ससारख्या सेवांच्या माध्यमातून युझर्सचे कंप्युटर हे सिक्युरिटी अपडेटच्या खाली मालवेअर्स टाकून हॅक केले जात आहेत. अमेरिकेमध्ये ३ नोव्हेबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक असल्याच्या पार्श्वभूमीवर हे केले जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुगलच्या थ्रेड ऍनलिसिस ग्रुपचे मुख्य अधिकारी असणा-या शेन हल्टली यांनी यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये भाष्य आहे आहे. हा हल्ला सरकारपुरस्कृत असून, याला एटटीपी-३१ अटॅक्स असे म्हटले जाते, अशी माहिती शेन यांनी दिली आहे. अमेरिकन यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्यांसंदर्भात इशारा दिला होता.

आम्ही त्या संस्थासोबत काम करत असून इतर कंपन्यांनाही यासंदर्भातील माहिती आणि डेटा शेअर करावा, असे शेन यांनी म्हटले आहे़ सरकारपुरस्कृत एटीपी-३१ हल्ल्यांसंदर्भात बोलताना शेन यांनी, या हल्ल्यातील डेटा हा अधिकृत सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवला जात आहे़ त्यामुळेच हा हल्ला रोखण्यासाठी नेटवर्क सिग्नल डिटेक्शनवर अवलंबून राहता येत नाही, असे स्पष्ट केले आहे. हॅकर्स ईमेलच्या माध्यमातून लिंक पाठवून त्यामधून गिटहबसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यंत्रणेमध्ये घातक होस्ट कोड इन्टॉल करु शकतात, असेही शेन सांगतात.

पायथॉन लँगवेज मध्ये मालवेअर तयार
पायथॉन या कंप्युटर लँगवेजमध्ये हा मालवेअर तयार करुन आला असून या माध्यमातून हॅकर्स फाईल डाऊनलोड अथवा अपलोड करु शकतात. तसेच ड्रॉपबॉक्सच्या क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिसेसच्या माध्यमातून कंप्युटरला कमांडही देऊ शकतात.

अनेकांचे अकाउंट हॅक
यापूर्वी जून महिन्यामध्ये ट्रम्प यांचा प्रचार करणा-या व्यक्तींचे तसेच, बिडेन यांचा प्रचार करणा-यांचेही ईमेल अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे गुगल सांगते. त्यावेळी हे प्रयत्न गुगलमधील तज्ज्ञांनी हाणून पाडले होते.

अमेरिकेलाही सावधानतेचा इशारा
सध्या करण्यात आलेल्या हल्ल्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवारांशी काही संबंध आहे की नाही हे शेन यांनी थेटपणे स्पष्ट केलेले नाही़ मात्र अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या इशा-यांसंदर्भात सजग राहण्याची गरज असल्याचे शेन म्हणाले.

नवरात्र एक इव्हेंट मॅनेजमेंट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या