27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयदेशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल करणे सुरू केले आहे. लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्राने अनलॉकच्या ५ व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा, स्वीमिंग पूल सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

१५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे. चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली असून, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्वीमिंग पूल उघडणार असल्याचे सांगितले आहे.

अनलॉक-४ चा टप्पा संपल्यानंतर केंद्र सरकारने अनलॉकच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली आहे.
अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण क्षमतेच्या ५० टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येईल. प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असं केंद्राने म्हटले आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन
मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने गाइडलाइन्स स्पष्ट केल्या आहेत.

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या