कंधार : प्रतिनिधी
कंधार शहर व तालुक्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून प्रशासनाने चांगली पकड ठेवली होती मात्र काही दिवसापासून शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे त्यातच कंधार शहरातील छोटे-मोठे व्यापारी दुकाने उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे बाहेरून येणाº्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहता शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात प्रत्येक गावासह कंधार शहरात मोठ्या प्रमाणावर परराज्यांतून तसेच दुसºया जिल्ह्यातून येत आहेत त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे शहरातील काही व्यापारी अर्धवट शटर उघडून तर काही छुप्या मागार्ने बिनदिक्कतपणे व्यापार करीत असून नगरपरिषद झोपेत काम करीत आहे का असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आ हे सध्या तालुक्यात कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही ही अत्यंत चांगली बाब आहे पण रस्त्यावर गर्दी वाढत असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स सिंगचा फज्जा उडत आहे.
Read More नांदेडला कोरोनाचा विळखा वाढला, १८ नवे रुग्ण
कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जमावबंदी चे आदेश असताना आणि अत्यावश्यक खरेदीसाठी सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर पाळण्यासह मास्क किंवा रुमाल वापरण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे काही ठिकाणी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यापारांना शासनाने नियम दिले असताना दुकानातील मुनीम, हमाल तसेच व्यापारी शासनाचे नियमाचे पालन करताना दिसून येत नाहीत. शहरातील ग्रामीण बँक एसबीआय बँक आणि एटीएम समोर तुफान गर्दी दिसून येत आहे.
उशिरा का होईना नगरपालिका व पोलिस प्रशासनाने मुख्य मार्गावरील फळविक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी या विक्रेत्यांना जिल्हा परिषद मैदानावर जागा उपलब्ध करून दिली असून भाजीपाला व फळ विक्रेते यांना खरेदी करताना नागरिकांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क व्हावा या उद्देशाने कंधार नगरपालिका प्रशासनाने येथील भाजीपाला व फळ विक्रेते यांना जिल्हा परिषद मैदानावर जागा उपलब्ध करून दिली आहे येथे भरणाºया बाजारात अधिक व्यवस्थित करून तसेच चुन्याचे रेखांकन करून चौकट तयार करण्यात आले आहे़