26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानात गृहयुद्ध पेटले

पाकिस्तानात गृहयुद्ध पेटले

एकमत ऑनलाईन

इम्रान खान समर्थक आक्रमक, पोलिसांसोबत झटापट
इस्लामाबाद : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये आता गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोलिस आल्यानंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर आता इम्रान खान यांना लाहोर उच्च न्यायालयाने दिलासा दिला. पीटीआय समर्थक आणि पोलिसांमधील दिवसभर चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लाहोर उच्च न्यायालयाने पुढचा आदेश येईपर्यंत म्हणजे गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोलिस कारवाईला स्थगिती दिली आहे.

मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली. अनेक तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना इम्रान खान यांना अटक करण्यात यश आलेले नाही. त्याचवेळी इम्रान खान यांना पुढचा आदेश येईपर्यंत अटक करु नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी बुधवारी सकाळी जमान पार्कच्या बाहेर इम्रान खान यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु पीटीआय समर्थकांनी तो हाणून पाडला. पीटीआय समर्थकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दुसरीकडे लाहोरमध्ये पीटीआय समर्थकांनी पाण्याचा टँकर, मोटारसायकल आणि इतर वाहने जाळली. मॉल रोडवरील वॉर्डनच्या कार्यालयाचीही तोडफोड केली. सकाळी १०:३० वाजता चिलखती असलेली पोलिस व्हॅन पुन्हा एकदा इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोहोचली. सोमवारपासून पीटीआय कार्यकर्त्यांची इस्लामाबाद पोलिस, पंजाब पोलिस आणि नंतर रेंजर्सच्या कर्मचा-यांशी झटापट सुरू होती. या चकमकींमध्ये आतापर्यंत सुमारे ३० पोलीस जखमी झाले आहेत, तर पीटीआयच्या किमान १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. परिसरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही परिणाम झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या