27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभेसाठीच्या उमेदवारीवर वंचित केली भूमिका स्पष्ट

राज्यसभेसाठीच्या उमेदवारीवर वंचित केली भूमिका स्पष्ट

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अगामी येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळले आहे.

काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. शिवाय निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचे काम करत असतो असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे. याबाबत वंचितने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी हा खुलासा केला आहे. प्रसिद्धीपत्रकात जारी केल्याप्रमाणे, या बातमीत काहीही तथ्य नसून काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अजूनही प्राप्त झालेला नाही.

निवडणुका जवळ आल्या की, काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरुन खोट्या बातम्या पेरण्याचे काम करत असतो. अशा खोट्या बातम्या पेरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या